पुणे : पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रेसिंग कार बनवली आहे. दीड वर्ष अपार मेहनत घेऊन विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार अवघ्या 4 सेकंदात 100 किमीचा स्पीड गाठू शकते. या कारचं इंजीन 600 सीसीचं आहे. विशेष बाब म्हणजे, सप्टेंबर महिन्यात जपानला होणाऱ्या फॉर्म्युला स्टुडंट रेसमध्ये ही कार सहभागी होणार आहे.
दरवर्षी ह्या विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्टवर काम करावं लागतं. यंदा या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार केला. या कार रेसिंगचे वैशिष्ट्या म्हणजे दिल्लीतील सुप्राएसएई सोसायटी ऑफ ऑटो मोटिव्ह इंजिनिअरर्समध्ये या गाडीनं पहिला क्रमांक पटकवला आहे.
दिल्ली जिंकल्यानंतर आता सप्टेंबरच्या पहिल्या अठवड्यात एफएसजे म्हणजेच फॉरम्युला स्टुंडंन्ट जापन रेससाठी हे विद्यार्थी कार घेऊन जाणार आहेत. त्या स्पर्धेत जगभारातून फक्त 400 गाड्या येणार असल्यानं त्यांना विषेश अशी तयारी करावी लागत आहेत.