मुंबई : आपण फॅशनमधले नवनवीन बदल नेहमीच आत्मसात करत असतो. पण फॅशन आणि हाय-टेक टेक्नॉलॉजी यांना एकत्र केलं, तर काही भन्नाट घडू शकतं. असाच भन्नाट प्रकार मुंबईतल्या नेहरु तारांगणमध्ये आयोजित गिफ्टेक्स फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळाला. या फेस्टिव्हलमध्ये हायटेक टीशर्ट उपलब्ध होते.

28 ते 31 जुलैदरम्यान नेहरु तारांगणमध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिव्हलमध्ये टेक्नॉलॉजीद्वारे अनेक नवनवीत प्रयोग करुन, तयार केलेल्या भेट वस्तू उपलब्ध असतात. यंदा या प्रदर्शनामध्ये एलइडीचे टी-शर्ट लोकांचं लक्ष वेधून घेत होते.

या टीशर्टमध्ये एलईडी पॅनल देण्यात आलं होतं. हे पॅनल ब्लू-टूथद्वारे मोबाईलशी कनेक्ट करुन ऑपरेट करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. विशेष म्हणजे, या एलईडी पॅनेलवरील शब्द वेळोवेळी बदलण्याची सुविधाही यात उपलब्ध करुन देण्यात होती.

विशेष म्हणजे, हे एलईडी वॉटर प्रूफ असल्याने, हे टी-शर्ट पाण्यात धुता येऊ शकतात. या फेस्टिव्हलमध्ये हे टी-शर्ट तीन हजार रुपयांपासून उपलब्ध होते.

व्हिडीओ पाहा