मुंबई : ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार केबल आणि डीटीएच सेवांचे दर कमी होणार आहेत. ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्याच चॅनेलसाठीचे पैसे मोजावे लागणार आहेत. याच कारणामुळे केबल ऑपरेटर्सनी गुरुवारी संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट जाहीर करत आपली सेवा तीन तासांसाठी बंद ठेवली होती.

ट्रायच्या नव्या नियमानुसार लागू होणारे दर 29 डिसेंबर 2018 पासून ग्राहकांना भरावे लागतील. मात्र ग्राहकांना चॅनेल आणि सेवा निवडण्याची आणि त्याचेच पैसे देण्याची मुभा असेल.

सरकारने 3 मार्च 2017 रोजी यासंबंधी एक परिपत्रक जारी केलं होतं.

29 डिसेंबर 2018 पासून नेमकं काय बदलणार?

ग्राहकांना दरमहा 130 रुपये नेटवर्क कॅपेसिटी फी म्हणून द्यावे लागणार. यात ग्राहकांना फ्री टू एअर असणारे 100 चॅनेल्स दाखवले जातील. यामध्ये दूरदर्शन, स्टार उत्सव, एबीपी न्यूज यासारख्या 100 चॅनेल्सचा समावेश असेल.

या 100 चॅनेल्सपैकी 26 चॅनेल्स दूरदर्शनची दाखवणं ऑपरेटर्सना बंधनकारक असेल. तसंच ही 100 चॅनेल्स एसडी फॉरमॅटमध्येच उपलब्ध असतील. मात्र तुम्हाला हीच चॅनेल्स एचडी फॉरमॅटमध्ये हवी असतील तर ती फक्त 50 दिली जाणार आहेत.

ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पेड चॅनेल्समध्ये कमीत कमी 50 पैसे तर जास्तीत जास्त 19 रुपये एका चॅनेलसाठी आकारता येणार आहेत. तसंच एखाद्या नेटवर्कची तुम्हाला सगळीच चॅनेल्स हवी असतील तर तो पर्यायही ग्राहकांसाठी खुला करण्यात आला आहे.

चॅनेल्सची बंडल्स ग्राहकांना माफक दरात उपलब्ध असतील.

सोनी 31 रुपये

झी 45 रुपये

स्टार 49

कलर्स 25

ही सर्व बंडल घेतल्यास ग्राहकांना 130+150=280 रुपये आणि त्यावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल.

म्हणजेच ग्राहकांना 330.40 रुपये द्यावे लागतील.

मराठी चॅनेल्ससाठी किती पैसे द्यावे लागतील?

कलर्स मराठी 15 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 17.70 रुपये

कलर्स मराठी HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये

सोनी मराठी 4 रुपये + 18 टक्के जीएसटी = 4.72 रुपये

स्टार प्रवाह 9 रुपये + 18 टक्के जीएसटी =10.62 रुपये

स्टार प्रवाह HD 15 रुपये + 18 टक्के जीएसटी = 17.70 रुपये

झी मराठी 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये

झी मराठी HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये

झी युवा 10 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 11.80 रुपये

झी टॉकीज 17 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 20.06 रुपये

झी टॉकीज HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये

एबीपी माझा 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे

न्यूज 18 लोकमत 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे

झी 24 तास 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे

या लिंकवर जाऊनही चॅनेलच्या किमती आपण चेक करु शकता.

https://sidtalk.com/DTH/channel_price.pdf