लंडन : भारतात दरवर्षी मोबाइल फोनच्या मागणीत प्रचंड वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू झाल्यानंतरही स्मार्टफोनच्या मागणीत काहीही परिणाम झालेला नाही. जगप्रसिद्ध रिसर्च फर्म जीएफकेने याबाबत माहिती दिली आहे. याबाबतच्या रिपोर्टमध्ये  त्यांनी असं म्हटलं आहे की, 'भारतात स्मार्टफोनची मागणी बरीच आहे. 2017मधील दुसऱ्या त्रैमासिकात देखील मागणीत वाढ असल्याचं दिसून आलं आहे.'


सध्या आशियात स्मार्टफोनची मागणी जास्त आहे. यंदा यात 13 टक्के वाढ दिसून येत आहे. यामध्ये बांगलादेश आणि मलेशियात सर्वात आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे.

या रिपोर्टनुसार, 'बांगलादेशमध्ये स्मार्टफोनच्या मागणीत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मलेशियामध्ये 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.'

दरम्यान, भारतात जीएसटी लागू झाल्यानंतरही स्मार्टफोनच्या मागणीत कोणतीही घट अद्याप झालेली नाही. या वर्षात आतापर्यंत 23.4 कोटी स्मार्टफोनची विक्री झाली आहे. म्हणजेच दरवर्षीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी यात वाढ झाली आहे.