Google Health App: गुगल घोरणे आणि खोकला ओळखणाऱ्या फीचरवर काम करत आहे. एका रिपोर्टनुसार, Google हे आगामी फीचर आपल्या Pixel किंवा Android स्मार्टफोनमध्ये देऊ शकते. असे सांगण्यात येत आहे की, या फीचरवर काम करण्यासाठी कंपनीने स्लीप ऑडिओ कलेक्शन स्टडी केला आहे. जो फक्त गुगल कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. 


9To5Google च्या ताज्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, Google खोकला आणि घोरणे ओळखणाऱ्या फीचरवर काम करत आहे. गुगल हेल्थ स्टडीजच्या नवीनतम अपडेटमध्ये स्लीप ऑडिओ कलेक्शनचा अभ्यास दिसून आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ पूर्णवेळ Google कर्मचारीच या अभ्यासात सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोनही असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, स्टीडची एक अट आहे की खोलीत फक्त एक सहभागी झोपलेला असावा.


कंपनी झोपण्याच्या वेळेच्या मॉनिटरिंग फीचरमध्ये खोकला आणि घोरणे याचे अल्गोरिदमचे भाषांतर करणार आहे. या फीचरचा उद्देश वापरकर्त्याच्या झोपेशी संबंधित बारीकसारीक तपशील प्रदान करणे आहे. आगामी काळात कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये हे नवीन मॉनिटरिंग फीचर सादर करू शकते. असं असलं तरी अद्याप कंपनीने याबाबत पुष्टी केलेली नाही. तसेच हे नवीन फीचर फक्त पिक्सेल स्मार्टफोन पुरते मर्यादित असेल किंवा इतर Android डिव्हाइसवर उपलब्ध केले जाईल, याबाबत ही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


Google Pixel 6A लवकरच भारतात होणार लॉन्च


Google I/O 2022 इव्हेंटमध्ये Google ने आपला नवीन Pixel मालिका फोन Google Pixel 6a लॉन्च केला आहे. आता लवकरच हा फोन भारतातही लॉन्च होणार आहे. Google India ने स्वतः अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. गुगलने ट्विट केले आहे की, Pixel 6a भारतात या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होईल. अमेरिकेत Google Pixel 6A ची किंमत  499 डॉलर्स (सुमारे 38,614 रुपये) आहे. अशा परिस्थितीत भारतातही हा फोन 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.