मुंबई : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा दावा करणाऱ्या रिंगिंग बेल्स कंपनीचा ‘फ्रीडम 251’ स्मार्टफोनचा पहिला लूक जाहीर प्रसिद्ध करण्यात आला आहे. येत्या 30 जूनपासून कंपनी ‘फ्रीडम 251’ स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. स्मार्टफोनचे 2 साथ हँडसेट्स विक्रीसाठी तयार आहेत.


 

रिंगिंग बेल्स कंपनीचे संस्थाप आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गोयल यांनी नोएडातील सेक्टर-62 मधील आपल्या कार्यलयात सांगितलं की, रिंगिंग बेल्स कंपनी आपलं वचन पूर्ण करण्यात यशस्वी झाली आहे.

 

गोयल यांनी सांगितले की, “आम्ही जवळपास दोन लाख फ्रीडम-251 स्मार्टफोनसोबत तयार आहोत. शिवाय, दोन लाख स्मार्टफोन्सची विक्री झाल्यानंतर पुढील नोंदणी सुरु केली जाणार आहे.

 

30 जूनआधी 25 लाख स्मार्टफोन बाजारात आणण्याचा दावा कंपनीने फेब्रुवारीत केला होता. मात्र, आता 30 जूनआधी 2 लाख स्मार्टफोन बाजारात आणले जाणार आहेत. तीन दिवसांत कंपनीला 7 कोटी रजिस्ट्रेशन मिळाले आहेत.

 

गोयल यांनी सांगितले की, प्रत्येक स्मार्टफोनवर 140 ते 150 रुपयांचं नुकसान होणार आहे. मात्र, जास्तीत जास्त संख्येत स्मार्टफोनची विक्री झाल्यास फायदा होतो, असेही गोयल म्हणाले.

 

या स्मार्टफोनमध्ये 3G सपोर्टही करणार आहे. यामध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरी आणि 32 जीबीपर्यंत एसडी कार्डच्या सहाय्याने मेमरी वाढवण्याची सुविधा असणार आहे. फोनमध्ये

 

या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 3.2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा आहे.  काळा आणि सफेद रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.