नवी दिल्ली : कूलपॅडने ‘मॅक्स’ या स्मार्टफोनवर तब्बल 11 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. त्यामुळे आता अमेझॉन इंडिया या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन हा स्मार्टफोन फक्त 13 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. मात्र, डिस्काऊंट सेलदरम्यानच ही ऑफर तुम्हाला मिळेल.

कूलपॅड मॅक्स स्मार्टफोनसोबतच कंपनीने मेगा 2.5D या स्मार्टफोनवरही 100 टक्के कॅशबॅक ऑफर दिली असून, या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे.

‘कूलपॅड मॅक्स’चे स्मार्टफोन :

 

  • 5 इंचाच एचडी एलसीडी स्क्रीन (1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन)

  • 5D के गोरिल्ला ग्लास

  • ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर

  • 4 जीबी रॅम

  • 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज (एसडी कार्डच्या सहाय्याने स्टोरेज वाढवण्याची सुविधा)

  • 13 मेगापिक्सेल कॅमेरा

  • 5 मेगापिक्सेल कॅमेरा

  • अँड्रॉईड लॉलिपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टीम

  • CoolUI 8.0 यूझर इंटरफेस


 

या स्मार्टफोनमध्ये 2800 mAh क्षमतेची बॅटरी असून, क्विक चार्जसाठी 3.0 ला सपोर्ट करतो. अवघ्या 30 मिनिटांत शून्य टक्के ते 65 टक्के बॅटरी चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे.