Google Birthday Today 27th September : सर्च इंजिन गूगल (Google) आज आपला 23वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्तानं गूगलनं एक डूडलही (Doodle) तयार केलं आहे. डूडलमध्ये दाखवण्यात आलेल्या केकवर 23 लिहिण्यात आलं आहे. त्यासोबतच केकवर मेणबत्तीही लावण्यात आली आहे. दरम्यान, इंटरनेट सर्च इंजिन असलेलं गूगल आज जगातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. आपल्याला कोणत्याही गोष्टीबाबत माहिती हवी असल्यास फक्त एका क्लिकवर गूगल ती माहिती आपल्याला देतं. गूगलकडे आपल्याला पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं असतात, असंही आपण नेहमीच ऐकतो. जाणून घेऊया गूगलच्या वाढदिवसाबाबत काही खास गोष्टी... 


गूगलचा शोध 1998 मध्ये सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांनी, Larry Page आणि Sergey Brin यांनी केली होती. याची सुरुवात एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून जाली होती. लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी Google.stanford.edu या अॅड्रेसवर इंटरनेट सर्च इंजिन तयार केलं होतं. लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी ऑफिशिअली लॉन्च करण्यापूर्वी त्याचं नाव 'Backrub'ठेवलं होतं. ज्याचं नाव नंतर गूगल ठेवण्यात आलं होतं. 


या दोन विद्यार्थ्यांनी सांगितंल होतं की, 'आम्ही आमच्या सिस्टमचं नाव Google ठेवलं आहे. कारण हे 10100 या googol साठी कॉमन स्पेलिंग आहे. तसेच आमचं लार्ज स्केल सर्च इंजिन तयार करण्याच्या ध्येयासाठीही शोभून दिसतंय.'


गूगलसाठी 27 सप्टेंबर का आहे खास? 


15 सप्टेंबर 1995 रोजी Google.com डोमेनचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. परंतु, गूगलला कंपनी म्हणून 4 सप्टेंबर 1998 रोजी रजिस्टर करण्यात आलं होतं. अशातच 27 सप्टेंबर रोजी गूगल सर्च इंजिनवर रेकॉर्ड नंबर्स पेज सर्च करण्यात आले होते. तेव्हापासून याच दिवशी गूगलचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. दरम्यान, गूगल आज जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून ओळखलं जातं. गूगलमार्फत आज 100 हून अधिक भाषांमध्ये सर्च करता येतं. सर्च इंजिन गूगलचा वापर लॅफटॉप, कम्प्युटरमध्येही वापरता येतं.