मुंबई : गूगलनं पायरसीविरोधात एक पाऊल पुढे टाकत टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. टॉरंटफ्रिकच्या रिपोर्टनुसार गूगलनं हॉलिवूडमध्ये चालणाऱ्या पायरसीवर निशाणा साधत टॉरंट वेबसाईटवर बंदीचा निर्णय घेतला आहे. गूगलसोबतच बिंग, याहू, यासारख्या सर्च इंजिनकडूनही टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्यात येणार आहे.
गूगल, बिंग आणि याहूसारख्या कंपन्यांची बैठक नुकतीच ब्रिटनमध्ये झाली. यावेळी हॉलिवूडचे प्रतिनिधीही या बैठकीला सहभागी होते. गूगलच्या या मोहिमेला ब्रिटनमधून सुरुवात होणार आहे. ब्रिटनमधील टॉरंट वेबसाईट्स आणि सर्व्हरवर बंदी घातली जाणार आहे. 1 जून 2017 पासून या वेबसाईट्स वापरता येणार नाहीत. त्यामुळे जगभरातील टॉरंट वापरकर्त्यांना याचा फटका बसणार आहे.
गूगलनं मागच्याच वर्षी भारतातील किक्कॅस टॉरंट आणि सर्च इंजिन टॉरंट्सवर बंदी घातली होती. भारतात टॉरंट डाऊनलोड करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी टॉरंट डाऊनलोड करणाऱ्याला दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
संबंधित बातम्या :