ख्रिसमससाठी गूगलकडून भेट, गूगल प्ले मूव्हीजवर भरघोस सूट
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2016 07:52 AM (IST)
मुंबई : ख्रिसमससाठी गूगलनं ग्राहकांसाठी खूशखबर आणली आहे. गूगल प्ले मूव्हीजवर कोणतीही फिल्म सवलतीत पाहता येणार आहे. इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गूगलनं ग्राहकांसाठी ही ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत गूगल प्ले मूव्हीज वरील कोणतीही फिल्म फक्त 20 रुपयात पाहता येणार आहे. यात जुन्या फिल्मसोबत नव्या ब्लॉकबस्टर फिल्म्सचाही समावेश आहे. या ऑफर अंतर्गत सुसाईड स्क्वार्ड, फाइंडिंग डॉरी, द जंगल बुक, सुलतान, एक्स मॅन, कॅप्टन अमेरिका सीव्हिल वॉर, ज्यूपोटिया यासारख्या असंख्य सिनेमांचा लाभ घेता येईल. ख्रिसमससाठी ही ऑफर देण्यात आली असली तरीही 23 जानेवारीपर्यंत ही ऑफर उपलब्ध असेल. या ऑफरसाठी देण्यात आलेल्या प्रोमोकोडचा फक्त एकदाच वापर करता येईल. ख्रिसमसच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर ऑफर्स दिल्या जातात. मात्र सिनेरसिकांसाठी गूगलची ही भेट अनोखी ठरणार आहे.