हे तिन्ही फोन एचटीसीकडून तयार करण्यात येतील. 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 57 हजार रुपये, 128 जीबी मॉडेल 66 हजार आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या XL ची किंमत 76 हजार रुपये आहे.
गूगलची अॅपलला टक्कर?
पिक्सेल आणि पिक्सेल XL बाजारात 5 इंच आणि 5.5 इंच स्क्रिनमध्ये उपलब्ध असतील. गूगलच्या पिक्सेल आणि पिक्सेल XL या दोन्ही फोन्सची किंमत 57 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे. त्यामुळे एका प्रकार गूगलने अॅपलला टक्कर दिली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सॅमसंग आणि इतर कंपन्यांसोबतही गूगलची स्पर्धा असणार आहे.
दमदार बॅटरी क्षमता
गूगलच्या पिक्सेल फोन्सची बॅटरी दमदार आहे. केवळ 15 मिनिट चार्ज होणार असून 7 तासांचा बॅकअप आहे. व्हिडिओ क्वालिटीसाठी यामध्ये व्हिडिओ स्टेबिलायझर देण्यात आलं आहे. पिक्सलच्या कॅमेऱ्यातून कमीत कमी सेकंदात फोटो काढता येतील. तसंच HDR+ पेक्षा पिक्सलच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असेल, असा दावाही गूगलने केला आहे.
फीचर्सः
- अल्यूमिनिअम बॉडी
- 2×2.15GHz आणि 2×1.6GHz क्वाड कोअर प्रोसेसर
- 4GB रॅम
- 32GB स्टोरेज
- 12 मेगापिक्सेलचा सेंसर
- 2700mAh आणि 3450mAh क्षमतेची बॅटरी