पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. गुगलचा यापूर्वीचा फोन पिक्सेलमध्ये सिंगल कॅमेरा देण्यात आला होता. लो लोईट फोटोग्राफीच्या बाबतीत या कॅमेऱ्याने आयफोन 7 लाही मागे सोडलं होतं. सध्या अॅपल आणि सॅमसंगसहित सर्वच कंपन्या ड्युअल रिअर कॅमेरा देत आहेत. मात्र गुगल सिंगल कॅमेरासह डिजीटल झूमचा ऑप्शन देत आहे.
गुगलच्या या फोनमध्ये ओरियो 8.0 ऑपरेटिंग सिस्टम असेल. ही ऑपरेटिंग सिस्टम आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये देण्यात आलेली नाही. गुगलचे हे फोन गेमिंग फोन असतील, असंही बोललं जात आहे.
दरम्यान या फोनचे सर्व फीचर उद्या म्हणजे लाँचिंगनंतरच समोर येतील. या फोनची किंमत आणि फीचर्सबाबत सध्या वेगवेगळे रिपोर्ट्स समोर येत आहेत. मात्र कंपनीकडून अधिकृत माहिती लाँचिंग कार्यक्रमातच दिली जाईल.