Google Maps Street View : जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गूगलने ( Google )  बुधवारी भारतामधील दहा महत्वाच्या शहरांमध्ये 'स्ट्रीट व्ह्यू'ला (Street View) परवानगी दिली आहे. तब्बल 11 वर्षांपासून यूजर्स या फिचरच्या प्रतिक्षेत होते. अखेर बुधवारी याला परवानगणी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर शहरांचा समावेश आहे. 


गूगल मॅप्सने (Google Maps) Genesys International आणि Tech Mahindra सोबत भागिदारी करत भारतात 'स्ट्रीट व्ह्यू' फिचर (Google Maps Street View Feature) जारी केले आहे.   सध्या प्रायोगिक तत्वावर बेंगळुरुमध्ये 'स्ट्रीट व्ह्यू'ला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील काही वर्षांमध्ये इतर शहरांमध्ये 'स्ट्रीट व्ह्यू'ला सुरुवात होणार आहे. 


कोणत्या शहरांमध्ये 'स्ट्रीट व्ह्यू'ला सुरुवात होणार - 
बेंगळुरु, हैदराबाद (Hyderabad), कोलकाता (Kolkata) नवी दिल्ली (Delhi), चेन्नई (Chennai), मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik), वडोदरा (Vadodra), अहमदनगर (Ahmednagar) आणि अमृतसर (Amritsar) या दहा शहारांमध्ये टप्प्या टप्प्याने 'स्ट्रीट व्ह्यू'ला सुरुवात होणार आहे. 


स्ट्रीट व्यू फीचर म्हणजे काय? काय होणार फायदा?
गूगलने त्यांच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, स्ट्रीट व्ह्यूच्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यात अनेक नवीन फीचर्स समाविष्ट केले जात आहेत. स्ट्रीट व्यू फीचरमध्ये अनेक  सुधारणा केल्यामुळे Android आणि iOS प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ते अनेक वर्षांपासूनचे जुने ऐतिहासिक स्ट्रीट व्ह्यू (रस्त्यांसह अनेक  फोटो) फोटो पाहू शकतील. एखाद्या ठिकाणाचे स्ट्रीट व्ह्यू पाहताना वापरकर्ते फोटोवर कुठेही टॅप करून त्यांना हव्या असणाऱ्या स्थानाची माहिती मिळवू शकतील. 


गूगलने जुन्या स्मार्टफोनमधील गूगल मॅपची सुविधा गेल्या  वर्षापासून बंद केली. जुन्या मोबाईलमध्ये गूगल मॅपची सुविधा वापरायची असेल तर त्यासाठी कमीत-कमी 3.0 हनीकॉम्ब (Android Honeycomb) इंस्टाल  करणे आवश्यक आहे. 


रस्त्यावरील वाहतूक कोंडीची मिळणार माहिती 
गूगलने आणलेल्या नवीन फिचर्समुळे लोकांना प्रवास करत असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झालीय का? किंवा मार्गावर अजून कोणत्या प्रकारचा अडथळा आहे का? याची देखील माहिती मिळणार आहे. याबरोबरच महामार्गावरील विविध सूचनांसाठी करण्यात आलेल्या मार्किंगची देखील माहिती समजणार आहे.