गेल्या 10 वर्षाच्या या परंपरेला गुगलकडून ब्रेक देण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी गुगलकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुगलच्या अधिकृत ब्लॉगमध्ये नाव देण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी अँड्रॉइडचा लोगो देखील बदलण्यात आला आहे. येत्या काही दिवसात गुगल नव्या लोगोसह अँड्रॉइड 10 चे अपडेट आपल्या युजर्ससाठी उपलब्ध करुन देणार आहे.
अँड्रॉइडच्या वेगवेगळ्या व्हर्जनला देण्यात आलेली नावं सुद्धा लोकप्रिय आहेत. दरवर्षी रिलीज करण्यात येणाऱ्या अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचं नाव कोणत्या गोड पदार्थाचं नाव असेल याचे अंदाज आतापर्यंत बांधले जात होते. परंतु ही नावं स्पष्ट आणि प्रत्येकाला लवकर समजावी यासाठी गुगलने आता आकड्यांच्या आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंतच्या अँड्रॉइड व्हर्जनची नावं :
Android 1.6 – डोनट
Android 2.0, Android 2.1 – इक्लेअर
Android 2.2 – फ्रोयो
Android 2.3, Android 2.4 – जिंजरब्रेड
Android 3.0, Android 3.1, Android 3.2 – हनी कॉम
Android 4.0 – आईस क्रीम सँडविच
Android 4.1 – जेली बीन
Android 4.4 – किटकॅट
Android 5 – लॉलीपॉप
Android 6 – मार्शमेलो
Android 7 – नगेट
Android 8 – ओरिओ
Android 9 – पाई