मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका नव्या गुगल अॅपची घोषणा केली आहे. 'गुगल लेन्स' असं या अॅपचं नाव असून हे अॅप अतिशय भन्नाट आहे. या अॅपमुळे मोबाइलच्या कॅमेऱ्याची व्याख्याच पूर्णपणे बदलली जाणार आहे.

या अॅपमध्ये कम्प्युटर व्हिजन आणि आर्टिफिशियल इंटेडलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्यामध्ये AI तंत्रज्ञान येणार आहे.

उदा. एखाद्या फोटोबाबत तुम्हाला काही माहिती हवी असेल तर गुगल लेन्स वापरा. गुगल लेन्स सुरु करताच तुम्ही काढलेला फोटो स्कॅन होईल आणि त्या फोटोसंबंधी सर्व माहिती एका क्षणात तुमच्या मोबाइल स्क्रिनवर दिसेल.  त्यामुळे तुमच्या मोबाइलचा कॅमेरा आता फक्त कॅमेरा राहणार नाही. तर तुम्हालरा फोटो कशासंबंधी आहे याचीही माहिती देईल. असा कंपनीचा दावा आहे.

समजा, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटचा फोटो स्कॅन केला तर तुम्हाला पुढच्या काही वेळात त्याबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
गुगल लेन्स अॅप हे गुगल अॅसिस्टेंटसोबतही वापरता येणार आहे. अॅसिस्टेंट अॅपमध्ये नव्यानं दिलेल्या ऑप्शन सिलेक्ट करुन यूजर बोलताना देखील लेन्स अॅक्टिव्हेट करु शकतो. त्यामुळे बातचीत सुरु असताना देखील एखाद्या फोटोबाबत जाणून घ्यायचं असेल तर यूजर्स संबंधित फोटो स्कॅन करुन त्याबाबत माहिती मिळवू शकतो.
एवढंच नाही तर, गुगल अॅसिस्टेंटच्या साथीनं गुगल लेन्स यूजर्सला भाषांतर करण्यासही मदत करेल.