मुंबई : गूगलच्या मेल सर्व्हिस जीमेलला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. जीमेल आजच्या घडीला जगभरातील सर्वात लोकप्रिय मेल सर्व्हिस आहे. 2004 साली पॉल बुचेट यांनी सुरु केलेल्या जीमेलची आज 100 कोटीच्या घरात यूझर्स आहेत.

जीमेल हे गूगलचं एक महत्त्वाचं उत्पादन आहे. गूगलला आपल्या प्रायव्हसी आणि सेफ्टी फीचर्समुळे नेहमीच नेटसॅव्हींची पंसती दिली आहे. त्यामुळे गेल्या 17 वर्षात मोठा टप्पा जीमेलनं गाठला आहे.

जीमेलच्या माध्यमातून यूट्यूब, गूगल ड्राईव्हसह गूगलच्या सर्व सेवा विनामूल्य वापरता येतात. तसंच गूगल प्ले, गूगल मॅप, गूगल प्लससारख्या सेवाही जीमेलच्या माध्यमातून घेता येतात.