मुंबई : जिओनीने नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘S10’ लॉन्च केला असून, त्यासोबत याच स्मार्टफोनचे दोन आणखी व्हेरिएंट S10B आणि S10C लॉन्च केले आहेत. किंमत किती?
  • जिओनी S10 – सुमारे 25 हजार रुपये
  • जिओनी S10B – सुमारे 20 हजार रुपये
  • जिओनी S10C – सुमारे 15 हजार रुपये
जिओनी S10 चे फीचर्स :
  • 5 इंच स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • 5GHz मीडियाटेक हेलियो P25 प्रोसेसर
  • 6 जीबी रॅम
  • 64 जीबी इंटरनल मेमरी
  • 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
चार हायक्वालिटी कॅमेरे जिओनी S10 स्मार्टफोनची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनला एकूण चार कॅमेरे आहेत. दोन बॅक कॅमेरे आणि दोन फ्रंट फेसिंग कॅमेरे आहेत. एक बॅक कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा, तर दुसरा बॅक कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. तर दुसरीकडे, एक फ्रंट फेसिंग कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा, तर दुसरा फ्रंट फेसिंग कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. या स्मार्टफोनमधील कॅमेरा 3D इफेक्ट आणि अपॅर्चरवर अत्यंत उत्कृष्टपणे नियंत्रण करणारे आहेत. 3450mAh क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे. जिओनी S10B चे निवडक फीचर्स :
  • 5 इंच स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • मीडियाटेक MTK6755 SoC प्रोसेसर
  • 4 जीबी रॅम
  • 3700mAh क्षमतेची बॅटरी
जिओनी S10C चे निवडक फीचर्स :
  • 32 जीबी स्टोरेज
  • 4 जीबी रॅम
  • 16 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
  • 13 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
  • 3100mAh क्षमतेची बॅटरी
जिओनीने हे तिन्ही स्मार्टफोन सध्या चीनमधील बाजारात खरेदीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. लवकरच हे तिन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.