मुंबई : जिओनी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात बजेट फोन घेऊन आली आहे. ‘जिओनी S10 लाईट’ स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. फ्लॅशसोबत 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनच्या आकर्षणाचं केंद्र आहे. त्यामुळे आधीपासूनच सेल्फीप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय म्हणून या स्मार्टफोनची उत्सुकता होती.     

या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप क्लोन फीचर देण्यात आल्याने, एकाचवेळी तीन व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.

15 हजार 999 रुपये किंमत असलेला ‘जिओनी S10 लाईट’ स्मार्टफोन आजपासून (23 डिसेंबर) विक्रीसाठी बाजारात दाखल होणार आहे. सोनेरी आणि काळ्या रंगांमध्ये स्मार्टफोनचे मॉडेल उपलब्ध असतील.

जिओनी S10 लाईटचे फीचर्स

  • ड्युअल नॅनो सिम स्लॉट

  • अँड्रॉईड 7.1 नुगा सपोर्टिव्ह (एमिगो 4.0 यूआय)

  • 5.2 इंचाचा स्क्रीन (720x1280 पिक्सेल रिझॉल्युशन

  • 4GHz स्नॅपड्रॅगन 427 प्रोसेसर

  • 4 जीबी रॅम

  • 13 मेगापिक्सेल रिअर सेन्सर कॅमेरा

  • 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, सोबत फ्लॅशन

  • 32 जीबी स्टोरेज

  • 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा

  • होम बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर

  • 3100 mAh क्षमतेची बॅटरी

  • 4G, VoLTE, वायफाय 11, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबी