मुंबई : जर्मनीतील शास्त्रज्ञांना नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारदर्शी मानवी अवयवांची निर्मिती करण्यात यश आले आहे. या संशोधनामुळे थ्री-डी प्रिंटरच्या साहाय्याने किडनी सारखे मानवी अवयव निर्माण करणे शक्य होणार आहे.


जर्मनीच्या म्युनिच येथील शास्त्रज्ञ अली इर्तुर्क आणि त्यांच्या टीमने या तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रान्सप्लांटसाठी किडनी, मेंदू हे अवयव तयार करता येणार आहेत.

या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या अवयावांची मायक्रोस्कोपद्वारे चाचणी करता येते. त्यामुळे या अवयवांची संरचणा तसेच रक्तवाहिन्यांची स्थिती याबाबतची माहिती मिळवता येते.

जगभरात थ्री-डी प्रिंटिंगचा वापर आज अनेक क्षेत्रांत केला जात आहे. आरोग्य क्षेत्रातही थ्री डी प्रिंटिंगचा थोड्याफार प्रमाणावर वापर करण्यात येतो. आतापर्यंत अशा पद्धतीने तयार करण्यात अवयवांची संरचना आणि इतर माहिती मिळविणे अवघड जात असे.

परंतु आता पारदर्शी अवयव निर्माण करणे शक्य असल्याने त्याचा या क्षेत्रात नक्कीच फायदा होऊ शकतो.