Facebook Hack : कधी कधी तुम्हाला तुमच्या परिचयाच्या व्यक्तीकडून Facebookवर मेसेज आला असेल. हॅलो, तुझ्याकडे गुगल पे आहे? अर्जंट पाच हजार पाहिजेत. तुम्ही काही विचारायच्या आता ती व्यक्ती तुमच्याकडून पैशांची मागणी वारंवार करू लागते आणि कधी कधी आपण विचार न करता अथवा शहानिशा न करता रक्कम पाठवून मोकळे होतो. पण सावधान. तुम्हाला आलेला मेसेज हा सायबर हॅकर्सकडून आलेला असू शकतो.


फेसबुक अकाऊंट हॅक होत म्हणजे नेमकं काय होत? Facebook account hack झाल्यानंतर काय करायचं?? तुमचं अकाऊंट हॅक कसं केलं जातं? अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्याल हवी. हेच आज आपण जाणून घेणार आहोत.  


मंडळी आपल्या देशात ऑनलाईन फ्रॉड च्या घटना वारंवार घडत आहेत. आता त्यासोबत सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून तुमच्या सोबत फसवणूक केली जात आहे. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्याच सोबत कधीकाळी असं घडलं असेल की तुमच्याच नावावरून तुमच्या मित्राला पैसे मागितल्याचा मेसेज गेला असेल. मेसेज आल्यानंतर आपण कशाचाही विचार न करता पैसे पाठवून देतो...नंतर लक्षात येतं की फेसबुक अकाऊंट हॅक झालंय. पण हे कोण करतंय तुम्हाला माहितीये का? हा सगळा प्रकार सायबर हॅकर्सकडून केला जातोय. यात अनेक मोठं-मोठ्या व्यक्तींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून त्यावरून पैशांची मागणी केली गेलीय. पण आपलं अकाऊंट हॅक झालंय हे कसं कळणार असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल.


तुमचे अकाउंट हॅक झाले असल्यास, तुम्हाला तुमच्या पेजवर काही गोष्टी दिसतील ज्या तुम्ही कधीही पोस्ट करत नाही. स्पॅम मॅसेज DM मध्ये दिसू लागले, चुकीचे फोटो किंवा व्हिडिओ जे तुम्ही पाठवले नाहीत ते दिसत असतील. तर समजून जा तुमचं अकाउंट हॅक झालंय. याशिवाय, तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे एक मॅसेज देखील मिळतो की तुमचे खातं कोणी तरी वापरत आहे. अकाउंट होल्ड मिळताच हॅकर्स सर्वात आधी तुमच्या अकाउंटचा पासवर्ड चेंज करतात. 


अकाऊंट हॅक झाल्यावर काय करायचं हे तेव्हा समजत नाही. पण घाबरुन जाऊ नका. फेसबुक खातं हॅक झाल्याचं समजल्यानंतर सर्वात आधी पासवर्ड बदला. त्यासाठी तुम्हाला सेटिंग्ज आणि प्रायव्हसी (Settings and privacy) मध्ये जावे लागेल. त्यानंतर पासवर्ड आणि सिक्युरिटी हा निवडावे लागेल.  त्यानंतर चेंज पासवर्डवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला जुना पासवर्डही टाकावा लागेल. पासवर्ड आणि सिक्युरिटी (Password and security) पेजवर तुम्ही तुमचे खाते कुठे लॉग इन केले आहे, ते तुम्हाला तपासावे लागेल. सर्व ठिकाणांवरुन तुम्ही ते लॉगआउट करा. आता जर तुम्हाला पैसे मागण्यासंदर्भात कोणताही मेसेज आलं तर काय काळजी घ्यावी तर ते ही बघा


काय काळजी घ्यावी...


मोबाईलवर आलेली कोणतीही लिंक क्लिक करू नये. 
फेसबुकवरून कुणी पैसे मागितल्यास पहिल्यांदा त्या व्यक्तीला फोन करून खात्री करुन घ्यावी. 
आपला फेसबुक आयडी लॉक करून ठेवावा. 
पैशांची मागणी केली असेल तर तातडीनं सायबर पोलिसांत तक्रार दाखल करावी.