नवी दिल्ली: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'फ्रीडम 251' बाजारात आणणाऱ्या रिंगिंग बेल्स कंपनी आता जगातील सर्वात स्वस्त एचडी एलईडी टीव्ही लाँच करण्याचा तयारीत आहे. लवकरच म्हणजे 25 जुलैला हा टीव्ही लाँच करणार आहे. याची किंमत 9,990 रु. आहे.

 

कंपनीचे सीईओ मोहित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, '25 जुलैला नोएडामध्ये एका खास कार्यक्रमात या एलईडी टीव्हीचं लाँचिंग करण्यात येणार असून यासाठी बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार हजेरी लावणार आहेत.'

 

31.5 इंचीच्या या एचडी एलईडी टीव्हीचं बुकींग 26 जुलैपासून सुरु होणार असून 15 ऑगस्टपासून याचं वितरण होणार आहे.

 

'कंपनीनं नुकतंच लाँच केलेल्या चार फीचर फोन्स, दोन स्मार्टफोन आणि तीन पॉवर बँकसाठी आतापर्यंत 48,000 जणांनी बुकींग केलं आहे.' अशी माहिती गोयल यांनी दिली आहे.