मुंबई: फोर्ड इंडियानं स्टेअरिंग पॉवर होजमध्ये बिघाड असलेल्या 39,315 कार परत मागवल्या आहेत. 2004 ते 2012 साली चेन्नईतील प्लांटमध्ये तयार झालेल्या फिएस्टा क्लासिक आणि फिगो हॅचबॅक कारमध्ये ही समस्या असल्याचं  आढळून आलं आहे.

कंपनीनं याबाबत म्हटलं आहे की, 'ज्या ग्राहकांच्या कारमधील स्टेअरिंग होजमध्ये बिघाड असेल त्यांनी आपल्या जवळच्या फोर्ड डीलरशीपच्या इथं जाऊन आपल्या कारमधील बिघाड दुरुस्त करुन घ्यावा.'


दरम्यान, फिएस्टा क्लासिक आणि जुन्या फिगो हॅचबॅक कारची विक्री भारतात सध्या बंद आहे. सध्या बाजारात दुसऱ्या जनरेशनची फिगो हॅचबॅक कार उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत 4.75 लाख (एक्स शोरुम) आहे.

एसयूव्ही सेगमेंटमध्ये फोर्डच्या एंडेव्हरला सध्या बरीच पसंती आहे. या कारची किंमत 25.49 लाख आहे.

स्टोरी सौजन्य: cardekho.com