मुंबई: दुचाकी, सायकल चालवताना हेल्मेटचा नेहमी वापर करा, असं कायम सांगितलं जातं. पण अनेक जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण ही चूक अनेकांना फार महागात पडते. यामुळे आजवर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. बऱ्याच जणांना हेल्मेट सोबत नेण्याचा कंटाळा असतो. 'एवढं जड हेल्मेट कोण सोबत नेणार?' असंही बरेच जण बोलून दाखवतात. पण आता यावर देखील उपाय शोधण्यात आला आहे.


हेल्मेट जड आहे अशी अनेक जण तक्रार करतात. हीच तक्रार लक्षात घेऊन आता एक आगळंवेगळं हेल्मेट तयार करण्यात आलं आहे. या हेल्मेटची खासियत म्हणजे याचं वजन फारच कमी आहे. त्यामुळे आता हे कुठेही घेऊन जाणं सोपं आहे.

आता हेल्मेटचीही घडी घालता येणार!

आतापर्यंत आपण अनेक मोठे हेल्मेट पाहिले आहेत. पण आता हे फोल्डिंगचं हेल्मेट तयार करण्यात आलं आहे. म्हणजेच तुम्हाला आता चक्क हेल्मेटची घडी घालता येणार आहे. इतकंच नव्हे तर हे घडी घातलेलं हेल्मेट तुम्ही तुमच्या बॅगेतही ठेऊ शकतात. त्यामुळे भलं मोठं, वजनदार हेल्मेट सोबत नेण्याचा त्रासही कमी होईल. हे हेल्मेट तयार करण्यासाठी एक खास तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे.

रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यात यावी असंही अनेकांनी आजवर सुचवलं आहे. आता अशाप्रकारचं हेल्मेट आल्यानं बाईकचालक नक्कीच याचा वापर करु शकतील.

VIDEO: