शुक्रवारपासून हा फोन ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होईल. जिओ फोनप्रमाणेच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही आकर्षक कॅशबॅक ऑफर्स आणि डेटा ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही 1399 रुपयांमध्ये स्मार्टफोन आणला आहे. शुक्रवारपासून हा फोन ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होईल. जिओ फोनप्रमाणेच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही आकर्षक कॅशबॅक ऑफर्स आणि डेटा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. 169 रुपयात 4G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग हा फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 169 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज केल्यानंतर 28 दिवसांसाठी दररोज 512MB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. फोन खेरदीवर 1500 रुपये कॅशबॅक हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 2899 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर सलग 36 महिने 169 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. स्मार्टफोन खेरदीच्या 18 महिन्यांनंतर ग्राहकांना 500 रुपये कॅशबॅक मिळेल. तर 36 महिन्यांनंतर उर्वरित 1 हजार रुपये कॅशबॅक दिला जाईल. असा मिळून 1500 रुपये कॅशबॅक दिल्यानंतर हा फोन तुम्हाला केवळ 1399 रुपयात मिळतो. एअरटेल-कार्बन A40 चे फीचर्स