लेनोव्हो Vibe K5 Note केवळ 9999 रुपयात
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2017 09:34 PM (IST)
या फोनची मूळ किंमत 11 हजार 999 रुपये आहे. मात्र या फोनच्या किंमतीवर सध्या 16 टक्के सूट दिली जात आहे.
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : तुम्ही सध्या मिड बजेट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे. फ्लिपकार्टवर लेनोव्हो Vibe K5 Note (गोल्ड, 32GB/3GB) हा स्मार्टफोन केवळ 9 हजार 999 रुपयात खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 11 हजार 999 रुपये आहे. मात्र या फोनच्या किंमतीवर सध्या 16 टक्के सूट दिली जात आहे. दुसरीकडे या फोनचं 4GB रॅम, 3GB स्टोरेज व्हेरिएंट 12 हजार 499 रुपयांऐवजी 10 हजार 499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय 3GB रॅम व्हेरिएंटवर 9 हजार रुपयांपर्यंत आणि 4GB रॅम व्हेरिएंटवर 9 हजार 500 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे. या दोन्हीही व्हेरिएंटवर प्रत्येकी 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. शिवाय तुम्ही अॅक्सिस बँकेच्या डेबिट कार्ड वापरुन हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टवर सध्या अनेक स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. सॅमसंग J5-6 900 रुपयांच्या डिस्काऊंटसह 10 हजार 90 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Vivo V5s या सेल्फी स्पेशल फोनवरही 1 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर सॅमसंग गॅलक्सी On Nxt 64GB/3GB व्हेरिएंट 17 हजार 900 रुपयांऐवजी 14 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.