नवी दिल्लीः फ्लिफकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटने एका दिवसात विक्रमी कमाई नोंदवली आहे. फ्लिपकार्टवर सोमवारी तब्बल 1400 कोटींचा व्यवहार करण्यात आला. भारतात एका दिवसात एखाद्या वेबसाईटवर एवढा व्यवसाय होण्याची ही पहिलीच वेळ आहे.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बिग बिलीयन डेज योजनेतंर्गत विविध वस्तूंचा सेल सुरु आहे.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, स्पोर्ट अशा विविध वस्तूंवर मोठी सूट दिली आहे. ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड पाहता अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील या सर्वच ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी खास दिवाळी ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये फ्लिपकार्टने बाजी मारली.

बँक ऑफ अमेरिका मेरील लिंचच्या सर्वेक्षणानुसार फ्लिपकार्टचा भारताच्या ई-कॉमर्स बाजारात 43 टक्के वाटा आहे. तर अमेझॉनचा वाटा 28 टक्के आहे. मात्र ऑनलाईन सर्वेक्षणानुसार 52 टक्के ग्राहकांनी अमेझॉनची निवड केली आहे. तर 34 टक्के ग्राहकांनी फ्लिपकार्ट आणि 8 टक्के स्नॅपडीलची निवड केली आहे.