फ्लिपकार्ट 'बिग 10 सेल': iPhone 7सह अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2017 03:41 PM (IST)
मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं उद्यापासून म्हणजेच 14 मे ते 18 मेपर्यंत 'बिग 10 सेल'चं आयोजन केलं आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोनशिवाय इतरही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवरही भरघोस सूट मिळणार आहे. तसेच या सेल दरम्यान एचडीएफसी बँक कार्डवरही 10% सूट देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टनं या सेलची माहिती देण्यासाठी एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, या सेलमध्ये आयफोन 7 आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येईल. तर या सेलमध्ये गुगलचा स्मार्टफोन पिक्सल हा 34,999 रुपयात उपलब्ध आहे. पिक्सल स्मार्टफोनची किंमत 57,000 रुपये आहे. तर रेडमी नोट 4 हा स्मार्टफोनही 15 मे रोजी सेलमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट 'बिग 10 सेल' मध्ये ओप्पो आणि व्हिवोच्या स्मार्टफोनवर देखील 4 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तर मोटो G3 टर्बो स्मार्टफोन 6,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर लेनोव्होचा Z2 प्लस स्मार्टफोनवर देखील 6 हजार रुपयांचं डिस्काउंट देण्यात आलं आहे.