मुंबई : व्हॉट्सअॅप हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेक जण फोनवर बोलण्यापेक्षा अनेक कामं व्हॉट्सअॅपवरच करणं पसंत करतात. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना असे काही फीचर्स आहेत, जे चॅटिंगचा आणखी चांगला अनुभव देतात.
चॅट पिन टू टॉप - तुम्ही एखाद्याच व्यक्तीशी जास्त वेळ बोलत असाल तर त्या व्यक्तीचा नंबर तुम्ही चॅट लिस्टमध्ये पिन करुन ठेवू शकता. कारण चॅटिंग करताना अनेकदा मध्ये-मध्ये मेसेज येतात. ज्यामुळे तुम्हाला वारंवार चॅट लिस्ट स्क्रोल करावी लागते. यामुळे चुकून दुसऱ्याला मेसेज जाण्याचीही भीती असते. त्यामुळे हा पर्याय चांगला आणि फायदेशीर आहे.
जीआयएफ – चॅटिंग करताना तुम्ही व्हिडिओ आणि फोटो तर पाठवू शकताच. शिवाय तुमच्या आवडीचे व्हिडिओ आणि फोटो मिळून त्याची जीआयएफ फाईलही तयार करु शकता. यासाठी अटॅच फाईल या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जीआयएफ तयार करायची आहे, ते फोटो किंवा व्हिडिओ निवडा. त्यानंतर सहा सेकंदात जीआयएफ फाईल तयार करु शकता.
टेक्स्ट फॉरमॅट - तुम्ही मेसेज पाठवताना आता त्याचा फॉरमॅटही बदलू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला बोलताना एखाद्य वाक्य ठळकपणे सांगायचं असेल तर ते बोल्डमध्ये पाठवू शकता. यासाठी तुम्हाला मेसेजच्या अगोदर आणि नंतर *_* टाईप करावं लागेल. शिवाय इटॅलिक फॉन्टचाही पर्याय आहे. त्यासाठी ‘_‘ हे टाईप करावं लागेल.
विविध भाषांचा पर्याय - व्हॉट्सअॅपवर तुम्ही नेहमी इंग्रजीतच बोलत असाल. मात्र तुम्हाला यामध्ये अनेक भारतीय भाषांचा पर्याय देण्यात आला आहे.
ऑटोमॅटिक डाऊनलोड पर्याय बंद करा – चॅटिंग करताना आपोआप फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड झाल्यामुळे डेटा तर वाया जातोच, शिवाय मोबाईल स्टोरेजही व्यर्थ जातं. मात्र सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ऑटो डाऊनलोड थांबवू शकता.
फोटो एडिट करा - व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवताना तुम्ही आता तो एडिट करुन पाठवू शकता. यासाठी अनेक फिल्टर ऑप्शन देण्यात आले आहेत. शिवाय फोटोवर टेक्स्ट लिहिण्याची सुविधाही देण्यात आली आहे.