मुंबई : अमेझॉनचा नोकिया वीक सुरु झाला आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या वीकमध्ये नोकिया 6 आणि नोकिया 8 या स्मार्टफोन्सवर खास कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे. अमेझॉन प्राईम मेंबर्सने अमेझॉन पे द्वारे पेमेंट केल्यास त्यांना अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.
जे प्राईम मेंबर्स अमेझॉन पेच्या माध्यमातून नोकिया 6 खरेदी करतील त्यांना 2500 रुपये कॅशबॅक मिळेल. तर इतर ग्राहकांना अमेझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 1500 रुपये कॅशबॅक दिला जाईल. प्राईम मेंबर्सने दुसऱ्या माध्यमातून पेमेंट केल्यास त्यांना केवळ 500 रुपये कॅशबॅक मिळेल.
अमेझॉनवर प्राईम मेंबर्सना नोकिया 8 साठीही कॅशबॅक दिला जाणार आहे. जे प्राईम मेंबर्स अमेझॉन पेच्या माध्यमातून हा फोन खरेदी करतील, त्यांना 1500 रुपये कॅशबॅक मिळेल. नोकिया 6 आणि नोकिया 8 खरेदी करताना तुम्हाला एक्स्चेंज ऑफरचाही पर्याय असेल.
नोकिया 6 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर नोकिया 8 36 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे दोन्ही फोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते. नोकिया 6 भारतात जूनमध्ये, तर नोकिया 8 ऑगस्टमध्ये उपलब्ध झाला होता.