चौकशी पूर्ण झाल्यानंतर कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. सिस्टमवर सायबर हल्ला झाला आणि पेमेंट पेजवर मॅलिशियस स्क्रिप्ट जोडण्यात आली. ज्याच्या मदतीने ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा डेटा चोरण्यात आला, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
''ज्या ग्राहकांनी नोव्हेंबरच्या मध्यापासून ते 11 जानेवारीपर्यंत वनप्लसच्या वेबसाईटवर फोन खरेदी केले त्यांच्या क्रेडिट कार्डने बनावट ट्रान्झॅक्शनचा प्रकार झाला. या काळात ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये सेव्ह क्रेडिट कार्ड किंवा पेपालच्या माध्यमातून खरेदी झाली असेल तर कार्ड सुरक्षित आहे,'' असंही कंपनीने सांगितलं आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत कंपनीने ग्राहकांची माफीही मागितली आहे.
ज्या ग्राहकांनी वनप्लसच्या वेबसाईटवरुन क्रेडिट कार्डने पेमेंट करत फोन खरेदी केले त्यांच्या क्रेडिट कार्डने बनावट ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न झाल्याचं गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. वनप्लस फोरमवर जवळपास 70 ग्राहकांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर कंपनीकडून या प्रकाराची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ही माहिती देण्यात आली.