वॉशिंग्टन : अमेरिकेच्या शेअर बाजारात काल (मंगळवार) झालेल्या अभूतपूर्व पडझडीचा फटका जगातील दिग्गज उद्योजकांनाही बसला आहे. वॉरेन बफे यांना एका दिवसात ५.३ अरब डॉलर अर्थात सुमारे ३४० अब्ज रुपयांचे नुकसान झालं. वॉरेन बफे हे फोर्ब्सच्या रिअल टाइम रॅकिंगमधले तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातात. त्यांनाही अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या उलथापालथीचा मोठा फटका बसला.
तर फेसबुकचा सीइओ मार्क झुकरबर्ग याला दिवसभरात ३.६ अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. ३.६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २३० अब्ज रुपयांचे नुकसान झालं आहे. फेसबुकचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरल्याचा फटका मार्क झुकरबर्गला बसला आहे.
भारतीय शेअर बाजारालाही फटका
दुसरीकडे, भारतीय बाजारपेठेतही काल मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. काल दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी घसरला होता. पण दिवस अखेर ही घसरण जरा सावरली. काल सकाळी 1200 अंकांनी झालेली घसरण दिवसअखेर 561 अंकांवर, तर निफ्टीची घसरण 168 अंकांवर थांबली.
अमेरिकन बाजारपेठेत झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेनं व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यामुळे व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असं फेडरल बँकेनं सूचित केलं आहे. त्यामुळे काल, अमेरिकन बाजारानं आपटी खाल्ली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला.
संबंधित बातम्या :
शेअर बाजारातील घसरण दिवसअखेर सावरली
शेअर बाजारात प्रचंड घसरण, सेन्सेक्स 1200 अंकांनी गडगडला
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेअर बाजार गडगडल्याने फेसबुकला अब्जावधी रुपयांचा फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Feb 2018 09:12 AM (IST)
अमेरिकेच्या शेअर बाजारात काल (मंगळवार) झालेल्या अभूतपूर्व पडझडीचा फटका जगातील दिग्गज उद्योजकांनाही बसला आहे
1. फेसबुक - तब्बल 81 टक्के स्मार्टफोन यूझर्स फेसबुक अॅप वापरतात, असं कॉमस्कोरने म्हटलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आपल्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहतात. फेसबुकने लाईव्ह आणि स्टोरी हे दोन नवीन फीचर्सही दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -