मुंबई : तुम्ही व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम दोन्हीही वापरत असाल, तर लवकरच तुमच्यासाठी एक नवं फीचर येणार आहे. कंपनी सध्या एका अशा फीचरची चाचणी करत आहे, ज्यामुळे इंस्टाग्राम युझर्सच्या इंस्टा स्टोरीज व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून शेअर होतील.


ही स्टोरी पोस्ट करण्यासाठी युझर्सना व्हॉट्सअॅपमध्ये जाऊन सेंड या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. इंस्टाग्राम स्टोरीज आणि व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासांसाठी लाईव्ह असते. तुम्ही मध्येच ही स्टोरी डिलीटही करु शकता. ज्या युझर्सना दोन्हीकडेही स्टेटस अपडेट करायचं आहे, त्यांचा या फीचरमुळे वेळ वाचणार आहे.

या फीचरची सध्या केवळ चाचणी सुरु असून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या इंस्टा स्टोरी थेट फेसबुकला शेअर करता येतात. त्यामुळे फेसबुकच्याच मालकीच्या असलेल्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपमध्येही आता हे फीचर मिळणार आहे.