फेसबुक मेसेंजरद्वारे चॅटिंग करत असताना एखादा मेसेज चुकून पाठवला गेला तर तो डिलीट करता येण्याचं नवं फीचर फेसबुकनं आणलं आहे. यापुर्वी व्हाट्सअॅपवर ही सुविधा उपलब्ध होती.


गेल्या वर्षी व्हाट्सअॅपनं एखाद्याला पाठवलेला मेसेज डिलीट करता येण्याचं फीचर आणलं होतं. चॅटिंग करताना एखादा मसेज चुकून दुसऱ्यालाच पाठवला गेला तर तो डिलीट करण्याची सोय त्यामुळे युजर्सला देण्यात आली होती. त्यानंतर फेसबुकवरही हे फीचर आता आणण्यात आलं आहे. चॅटिंगसाठी फेसबुक मेसेंजरचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या फीचरचा अनेकांना फायदा होणार आहे.

या नव्या फीचरमुळे फेसबुक मेसेंजरवरुन पाठवलेला मेसेज 10 मिनिटांच्या आत डिलीट करता येणार आहे. फेसबुकवरील ग्रुप चॅट तसेच प्रायव्हेट चॅटला देखील मेसेज डिलीट करण्याचा हा पर्याय देण्यात आला आहे. आपण पाठवलेल्या मेसेजवर 'प्रेस' केल्यानंतर 'Remove' चा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर व्हाट्सअॅपसारखं 'Remove for Everyone' हा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक करुन 10 मिनिटांच्या पाठवलेला मेसेज डिलीट करता येतो.