फेसबुकचे सध्या जगभरात 160 कोटी यूजर्स आहेत. तर 2014 साली 20 कोटी यूएसडीमध्ये खरेदी केलेल्या व्हॉटसअॅपचे 1 कोटीहून आधिक यूजर्स आहेत. फेसबुकचा आणखीन एक भाग असलेल्या इंस्टाग्रामचेही जगभरात 5 कोटी यूजर्स आहेत.
नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, फ्रांस, फिलिपिन्स, थायलंड आणि इतर यूरोपीय देश ही फेसबुकची बाजारपेठ असल्याचे मार्कस यांनी सांगितले.
फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून मोठ्या उद्योग समूहांना आपल्या जाहिराती यूजर्सपर्यंत पोहचवणे सहज शक्य होणार आहे. व्हॉटसअॅपवरून ही सुविधा उपलब्ध नसल्याने यामार्फत बिझनेस करणे शक्य नाही. पण तरीही यावरूनही जाहिराती प्रसारित करून बिझनेस जनरेट करण्यासंबंधीचे प्रयत्न सुरु आहेत.
फेसबुक मेसेंजर हे अॅप्पल ios वरून सर्वात जास्त वापरले जाणारे लोकप्रिय अॅप्लिकेशन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फेसबुक मेसेंजरवर 1700 कोटी फोटो शेअर होतात. 120 कोटी यूजर्स व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्स खेळतात.