रिलायन्स जीओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांची ही स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. आयडियाच्या जास्त डाटा वापरणाऱ्या ग्राहकांना दर कपातीचा खास फायदा होणार आहे.
आयडिया, एअरटेलची दर कपात
आयडियाचा 10 जीबीचा 3 जी आणि 4 जी डाटा पॅक आता 990 रुपयांत मिळत आहे. तर 5 जीबीचा डाटा पॅक 649 रुपयांत मिळत आहे. एअरटेलने देखील नुकतीच मोठी दर कपात केली आहे. आयडियाने रिलायन्स जीओने खास ऑफर आणल्यानंतर तत्काळ ही दर कपात केली, असं सांगितलं जात आहे.
रिलायन्स जीओचा धुमाकूळ
कमर्शिअल लाँचिंग अगोदरच रिलायन्स जियोसोबत 15 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. जीओ 2 हजार 999 रुपयाच्या मोबाईलसह 90 दिवसांसाठी 4 जी अनलिमीटेड डाटा आणि इंटरनेट कॉलिंग मोफत देत आहे, असा दावा रिलायन्सने केला आहे.