मुंबई : जगभरातील नेटसॅव्हींच्या पसंतीची सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने लाईव्ह व्हिडीओ शेअरिंगची सुविधा आपल्या सर्व यूझर्सना दिली आहे. फेसबुकच्या अँड्रॉईड किंवा आयओएस अॅपच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

 

या सुविधेचा पर्याय फेसबुक युझर्स आपल्या स्मार्टफोनवर स्टेटस अपडेट करताना पाहू शकतील. अँड्रॉईड यूझर्सना हा पर्याय स्टेटस बॉक्समध्ये 'Go Live' या नावाने दिसेल.



तसंच आयओएस यूझर्सना हा पर्याय स्टेटस बॉक्समध्ये 'Live Video' नावाने उपलब्ध असेल.

 



 

फेसबुक यूझर्स या सुविधेचा वापर करून फेसबुकवर लाईव्ह राहू शकतात. यापूर्वी ही सुविधा फक्त सेलिब्रिटी किंवा व्हेरिफाईड पेजनाच होती. पण आता फेसबुकवरील प्रत्येकाला ही सुविधा वापरता येणार आहे.