मुंबई: फेसबुकनं अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्ससाठी मेसेंजर अॅपचं लाइट व्हर्जन भारतात लाँच केलं आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मेसेंजर लाइट व्हर्जनची साइज 5 MB आहे. त्यामुळे यूजर्सचा बराच डेटा वाचणार आहे.
ज्या यूजर्सकडे कमी इंटरनेट स्पीड आहे किंवा ज्यांच्याकडे बजेट अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत अशा यूजर्संसाठी फेसबुकनं मेसेंजर लाइट व्हर्जन आणलं आहे. यामुळे यूजर्सच्या डेटाची बचत होणार आहे.
मेसेंजर लाइटचा यूजर इंटरफेस अगदी सोपा आहे. यामध्ये टेक्स्ट, फोटो आणि इमोजी पाठवणं अधिक सोपं असल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे. या सर्व फीचर्सनंतरही याची साइज फक्त 5 एमबी आहे. असं असलं तरीही मेसेंजर लाइटमध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि व्हॉईस कॉलिंग हे फीचर नसतील.
फेसबुकनं काही वर्षापूर्वीच मेसेंजर लाइट व्हर्जन लाँच केलं होतं. अखेर आज भारतात हे व्हर्जन लाँच केलं गेलं. याआधीही मेसेंजर लाइट हे जर्मनी, श्रीलंका, जपान या देशात लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत 20 कोटी लोक मेसेंजर लाइट वापरत असल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे.