फेसबुक-इंस्टाग्राम अर्धा तास बंद, जगभरातील युझर्सची अडचण
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2017 09:19 PM (IST)
भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासह अनेक देशांमध्ये फेसबुक युझर्सला या अडचणीचा सामना करावा लागला.
मुंबई : फेसबुक आणि इंस्टाग्राम जवळपास अर्धा तास बंद झाल्याने जगभरातील युझर्स वैतागले. अनेकदा प्रयत्न करुनही फेसबुक सुरु न झाल्याने युझर्सने आपला संताप ट्विटरवर काढला. भारतासह जगभरातील युझर्सला या अडचणीचा सामना करावा लागला. अनेक युझर्स या अर्ध्या तासामध्ये लॉग-ईनही करु शकले नाही. तर अनेकांना लॉग आऊट करण्यासाठी अडचण आली. त्यामुळे भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यासह अनेक देशांमध्ये फेसबुक युझर्सला या अडचणीचा सामना करावा लागला. दुसरीकडे फेसबुकच्या मालकीची असलेल्या इंस्टाग्रामचीही हीच अडचण झाली होती. युझर्सने अनेकदा प्रयत्न करुनही फोटो अपलोड होत नव्हते. दरम्यान फेसबुककडून याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. मात्र जगभरातून फेसबुकला याबाबत रिपोर्ट करुन विचारणा केली जात आहे.