मुंबई: फेसबुकनं एक नवा टप्पा गाठून मोठं यश मिळवलं आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये मंथली अॅक्टिव्ह यूजरची संख्या दोन अब्जांच्याही पुढे गेली आहे. पाच वर्षापूर्वी कंपनीनं 1 अब्जांचा आकडा पार केला होता.
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'तुमच्या सोबतचा प्रवास ही सन्मानाची बाब आहे.' फेसबुकच्या यूजर्सची संख्या ही आता एखाद्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे. जगाची एकूण लोकसंख्या 7.5 अब्ज आहे. तर फेसबुकचे यूजर्स हे 2 अब्जापेक्षा जास्त आहे.'
यावर्षी 31 मार्चपर्यंत फेसबुक सेवांचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या 1.94 अब्ज एवढी होती. यावर्षी पहिल्याच्या तुलनेने ही वाढ 17 टक्क्यानं अधिक आहहे.
ऑक्टोबर 2012 मध्ये फेसबुकनं 1 अब्जांचा आकडा पार केला होता.
फेसबुकचं मोठं यश, तब्बल दोन अब्ज यूजर्स!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2017 02:48 PM (IST)
The Facebook logo is pictured at the Facebook headquarters in Menlo Park, California, in this January 29, 2013 file photo. Facebook Inc advertising business grew at its fastest clip since before the company's May initial public offering, helping the company's revenue expand 40 percent to $1.585 billion. REUTERS/Robert Galbraith/Files (UNITED STATES - Tags: BUSINESS LOGO)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -