अकोला : कवयित्री आणि फॅशन डिझायनर असलेल्या अकोल्यातील 54 वर्षीय महिलेला फेसबुकवरची मैत्री चांगलीच महागात पडली. कारण, फेसबुकवरून परदेशी इसमाशी मैत्री केल्यामुळे महिलेला 48 लाख 51 हजारांचा गंडा बसला.
लंडनमधील व्हिक्टर सॅम्युअल नावाच्या इसमाने या महिलेशी फेसबुकवरून मैत्री केली. मैत्री चांगलीच जमल्यानंतर दोघे व्हॉट्सअॅपवरही बोलू लागले. मात्र एक दिवस चक्क सॅम्युअलने तिला परदेशातून भारतात भेटवस्तू देणार असल्याचं सांगितलं.
भेटवस्तूंचं कुरिअर दिल्लीला कस्टममध्ये अडकल्याचं सांगत या महिलेला प्रत्येकवेळी वेगवेगळी रक्कम भरायला सांगण्यात आलं. या सर्व प्रकारात या महिलेकडून तब्बल 48 लाख 51 हजारांची रक्कम वसूल करण्यात आली.
अमेरिका, इंग्लंड तसेच अन्य परदेशी रहिवासी असल्याचं दाखवून मैत्री करण्यात येते. त्यानंतर मोठ्या विश्वासाने फोटोंची देवाण-घेवाण करून विश्वास संपादन करण्यात येतो. यासाठी एक मोठं रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती आहे.
एकमेकांवर विश्वास बसल्यानंतर विदेशातील व्यक्ती गिफ्ट पाठवण्याचं आमिष देत भूरळ घालतात. त्यांच्या आमिषाला बळी पडताच कस्टम तसेच दहशतवादाचा धाक दाखवून रक्कम लुटण्यात येते.
दरम्यान याप्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी सॅम्युअल विरोधात गुन्हा दाखल केलाय.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फेसबुकवर मैत्री महागात, अकोल्यातील महिलेला 48 लाखांचा गंडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2018 05:40 PM (IST)
फेसबुकवरून परदेशी इसमाशी मैत्री केल्यामुळे महिलेला 48 लाख 51 हजारांचा गंडा बसला. भेटवस्तूंचं कुरिअर दिल्लीला कस्टममध्ये अडकल्याचं सांगत या महिलेला प्रत्येकवेळी वेगवेगळी रक्कम भरायला सांगण्यात आलं. या सर्व प्रकारात या महिलेकडून तब्बल 48 लाख 51 हजारांची रक्कम वसूल करण्यात आली.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -