नवी दिल्ली : फेसबुक (Facebook) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) सोबत सामंजस्य करार केला आहे. याच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटायझेशनसह एआर (Augmented Reality) तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने विद्यार्थी आणि शिक्षकांना डिजिटल सुरक्षा, ऑनलाईन कार्य आणि ऑग्मेंटेड रिअॅलिटीचं प्रशिक्षण देण्यासाठी फेसबुकसोबत करार केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑनलाईनसाठी येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेता यावी तसंच प्रशिक्षण घेता यावं यासाठी सीबीएसईनं हा कार्यक्रम राबवला आहे.


कोरोनामुळं शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. भविष्यात अशा शिक्षणपद्धतीवर अधिकाधिक जोर दिला जाऊ शकतो. त्यामुळं केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री निशंक यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं आहे की, सीबीएसई आणि फेसबुकच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षा, ऑनलाईन सुरक्षा आणि ऑग्मेंटेड रियलिटीसंबंधी प्रमाणित कार्यक्रम सुरु करण्यासाठी हा करार झाला आहे.


आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु
आज 6 जुलैपासून 20 जुलैपर्यंत या प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम 10 ऑगस्टपासून तर विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम 6 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सीबीएसई आणि फेसबुककडून या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन कोर्स पूर्ण करणाऱ्यांना ई-प्रमाणपत्र देणार आहे. या कराराअंतर्गत फेसबुक सीबीएसईला आर्टिफिशयल रिअॅलिटी सुरु करण्यासाठी मदत करणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांना तर दुसऱ्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शिक्षकांनी इथं करावी नोंदणी - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWbxK4bg72G-6JT6IZ214K5QWk2nXWUiHSNeDtMtTF98FWJA/viewform 

विद्यार्थ्यांनी इथं करावी नोंदणी - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf7Pm5mPK5Pji49nIBxGx7kpq7_G50On-p0y51lfDVHLRGoSg/viewform