केवळ एका व्यक्तीसाठी असणारी ही टॅक्सी स्वयंचलित असून तुम्ही फक्त गुगल मॅपवर पोहोचण्याचा पत्ता टाकल्यानंतर, ही आपोआप सुरु होते. आणि 100 किलोमीटर प्रतीतासाच्या वेगानं तुम्हाला निश्चित स्थळी पोहचवते.
2030 पर्यंत दुबईतील बहुतांश भार या टॅक्सी सेवेवर टाकण्याचा दुबई सरकारचा मानस आहे.
चीनी बनावटीची ही टॅक्सी येत्या जुलै महिन्यापर्यंत दुबईत लाँच होण्याचा अंदाज आहे. या टॅक्सीमुळं वेळेची, पैशाची बचत होईल शिवाय ट्रॅफिकमध्ये फसण्याचा त्रासही कमी होईल असं तज्ज्ञ सांगतात.