मुंबई : सॅमसंगनं W2017 फ्लिप फोन हा मागच्या वर्षी लाँच केला होता. आता सॅमसंगनं याचं नवं व्हेरिएंट SM-G9298 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत.
सॅमसंग SM-G9298 स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. यामध्ये 4.2 इंच ड्यूल स्क्रिन असून त्याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट प्रोसेसर देण्यात आलं आहे. तसेच यात 4 जीबी रॅमही देण्यात आली आहे.
यामध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये 2300 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 4जी, ब्ल्यूटूथ, जीपीएस, यासारखे कनेक्टिव्हिटीचे ऑप्शनही देण्यात आले आहेत.
दरम्यान, कंपनीनं अद्याप या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.