मुंबई: फ्री वाय-फाय म्हटलं की, अनेकांच्या यूजर्सच्या त्यावर उड्या पडतात. तात्काळ आपला मोबाइल किंवा लॅपटॉप कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण असं करत असल्यास तुम्ही फार मोठी चूक करत आहात. यावर झालेल्या एका रिसर्चमधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

14 देशात केलेल्या या सर्व्हेमध्ये जवळजवळ 30 टक्के भारतीय फ्री वाय-फाय वापरत असताना आपली आपली संवेदनशील आणि खासगी माहिती इंटरनेटवर टाकतात. उदा. क्रेडिट कार्डचा ऑनलाईन वापर. इंटल सिक्युरिटी इंडिया डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख वेंकट कृष्णापूर याचं म्हणण आहे की, 'अनेकदा यूजर्स संवेदशील माहितीचं आदान-प्रदान असुरक्षित वाय-फायच्या माध्यमातून करतात. त्यामुळे सायबर क्राईम वाढण्याची शक्यता आहे. कारण की यातून क्रेडिट कार्ड आणि वर्क मेलमधील माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.

 

भारताप्रमाणेच मेक्सिकोत 19 टक्के आणि ब्राझिलमध्ये 8 टक्के फ्री वाय-फायचा वापर करतात. 21 ते 54 वयोगटातील 1423 जणांवर हा सर्व्हे करण्यात आला. तर जागतिक पातळीवर 140000 लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला.

 

दरम्यान, सार्वजनिक वाय-फाय वापरताना आपली खासगी माहिती शक्यतो शेअर करणं टाळा.