मुंबई : अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवर दिवाळीनिमित्त बंपर ऑफर सुरु आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह मोबाईल फोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. ओप्पो, सॅमसंग, व्हिव्हो, एलजी, मायक्रोमॅक्स यांसारख्या कंपन्यांच्या फोनवर मोठी सूट देण्यात आली आहे.


कोणत्या फोनवर किती सूट?

LG Q6 : या फोनवर तब्बल 4 हजार रूपयांची सूट देण्यात आली आहे. 16 हजार 990 रुपये किंमतीचा हा फोन केवळ 12 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही 2500 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंटही मिळवू शकता.

सॅमसंग गॅलक्सी j7 प्राईम : अमेझॉनवर या फोनच्या किंमतीत 6 हजार 310 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 16 हजार 900 रुपये किंमतीचा हा फोन 10 हजार 590 रुपयांमध्ये मिळत आहे. शिवाय 503 रुपये प्रती महिना ईएमआयनेही हा फोन खरेदी करु शकता.

मोटो G5s प्लस : अमेझॉनवर या फोनचं 64GB व्हेरिएंट 15 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक हजार रुपयांची सूट या फोनवर देण्यात आली आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास इन्फिनिटी : या फोनवर 4 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. 13 हजार 999 रुपये किंमतीचा हा फोन 9 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

VIVO 5s : या फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटवर 20 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. 19 हजार 990 रुपये किंमतीचा हा फोन स्नॅपडीलवर 16 हजार 420 रुपयात खरेदी करता येईल.

ओप्पो F3 प्लस : फ्लिपकार्ट या फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटवर 20 टक्के सूट देत आहे. 30 हजार 990 रुपये किंमतीचा हा फोन 24 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

लेनोव्हो K8 नोट : अमेझॉनवर या फोनवर 2 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. 13 हजार 999 रुपये किंमतीचा हा फोन 11 हजार 999 रुपयांमध्ये मिळेल.

कूलपॅड नोट 3 : अमेझॉनवर या फोनच्या 32GB व्हेरिएंटवर 25 टक्के सूट देण्यात आली आहे. 11 हजार 999 रुपये किंमतीचा हा फोन 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.