सॅमसंग गॅलक्सी नोट 7 सह विमान प्रवासाला मनाई
एबीपी माझा वेब टीम | 09 Sep 2016 05:51 PM (IST)
नवी दिल्ली : सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी चार्जिंग करताना होणाऱ्या स्फोटाची धास्ती आता हवाई वाहतूक मंत्रालयालाही वाटत आहे. चेक इन बॅग्समध्ये गॅलक्सी नोट 7 स्मार्टफोन नेण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमान प्रवासात हे फोन स्वीच्ड ऑफ ठेवण्याची अटही ठेवण्यात आली आहे. डीजीसीएचे प्रमुख बी. एस. भुल्लर यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. विमान प्रवासात सॅमसंग गॅलक्सी नोट 7 सोबत घेऊन जायचा असल्यास तो स्वीच्ड ऑफ करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तक्रारीनंतर सॅमसंग कंपनीने गॅलक्सी नोट 7 फोन परत मागवले आहेत. विमान प्रवासातील सुरक्षिततेचा विचार करुन तात्काळ याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही भुल्लर म्हणाले. विमान प्रवासात ते चार्ज करणं किंवा स्वीच ऑन करणं दूरच, ते चेक इन बॅग्जमध्ये बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे.