मुंबई : व्हॉट्सअॅपचं बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'डिलीट फॉर एव्हरीवन' हे फीचर अखेर मिळालं आहे. आयफोन आणि विंडोजनंतर आता अँड्रॉईड फोनमध्येही हे फीचर मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर कधी चुकून एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठवला असेल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.


हे फीचर कसं काम करतं?

मेसेज पाठवणाऱ्या आणि मेसेज घेणाऱ्या दोन्हीही युझर्सकडे व्हॉट्सअॅपचं हे लेटेस्ट व्हर्जन असेल तरच हे फीचर काम करणार आहे. व्हॉट्सअॅप वेबवर हे फीचर काम करेन, असाही दावा करण्यात आला आहे. या फीचरसाठी मिनिटांची मर्यादा असेल. तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर सात मिनिटांच्या आतच तो डिलीट करु शकता.

चुकून पाठवलेला मेसेज दर तुम्हाला डिलीट करायचा असेल तर डिलीट ऑप्शनवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर ही अपडेट तुम्हाला मिळाली असेल तर तीन पर्याय येतील.



डिलीट फॉर एव्हरीवन, डिलीट फॉर मी आणि कॅन्सल असे तीन पर्याय या नव्या अपडेटनंतर तुम्हाला येतील. डिलीट फॉर एव्हरीवन केल्यास समोरच्या व्यक्तीकडचाही मेसेज डिलीट होईल. तर डिलीट फॉर मी केल्यास तुमच्या मोबाईलमधून मेसेज डिलीट होईल.