Smart Face Mask :  साधे कापडी मास्क किंवा मेडिकलमध्ये मिळणारे एन-95 मास्क हे अनेक जण वापरतात पण सध्या स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच प्रमाणेच स्मार्ट मास्कचा देखील ट्रेंड आला आहे. या मास्कमध्ये अनेक खास फिचर्स आहेत. जाणून घेऊयात या स्मार्ट मास्कच्या फिचर्स आणि किंमतीबाबत...

Philips ACM067/01 मास्कफिलिप्स कंपनीच्या या स्मार्ट मास्कमध्ये  4 स्टेज फिल्ट्रेशन आहे. तसेच हा मास्क 95% हानिकारक प्रदूषक आणि ऍलर्जीनपासून तुमचे संरक्षण करेल. तसेच या मास्कमध्ये फॅन मॉड्यूल आहे जे आर्द्रता आणि CO2 पातळी कमी करते. या मास्कची किंमत 6,850 रुपये आहे. 

AURA AIR Smartहा नॉन वॉस्बल फेस मास्क आहे. या फेसमास्कमध्ये मल्टी लेयर फिल्टर देखील आहे.  या मास्कची किंमत 5149 रुपये आहे.  

Smart Electric Air Purifier Face Maskस्मार्ट इलेक्ट्रिक मास्क एक एयर प्यूरिफायर या मास्कमध्ये चार लेअर फिल्ट्रेशन आहे. तसेच या मध्ये हाय शिल्ड सुरक्षा देखील आहे. हा मास्क बॅक्टीरिया, वायरस  आणि सूक्ष्म कण या सर्व गोष्टींपासून हा मास्क तुमचे संरक्षण करेल. या मास्कची किंमत 2850 रुपये आहे. 

Moksha Cloth N95 Maskया मास्कमध्ये  5V यूएसबी पोर्ट आहे. या मास्कची किंमत 3290 रुपये आहे. 

Ruishenger Wearable Air Purifiersया मास्कमध्ये  एअर प्यूरूफायर आहे. मिनी एअर प्यूरीफायर 7 लेअर सुरक्षा असते. या मास्कची बॅटरी एकदा चार्ज केली की सहा तास चालते. या मास्कची किंमत 4500 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक

WhatsApp And Telegram : 'यासाठी' व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम वापरू नका, सरकारकडून निर्देश

Google Chrome Update : जर तुम्ही Google Chrome वापरत असाल तर लवकर करा 'हे' काम, नाहीतर तुमचा डेटा हॅक होऊ शकतो

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha