मुंबई : कूलपॅड या चीनमधील प्रसिद्ध कंपनीने आपल्या ‘कूलपॅड नोट 3’ या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 8 हजार 999 रुपयांना लॉन्च केला होता आणि आता या स्मार्टफोनमध्ये 500 रुपयांची कपात केली आहे. आता या स्मार्टफोनची नवी किंमत 8 हजार 499 रुपये असेल. स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
‘कूलपॅड नोट 3’चे फीचर्स:
- 5 डिस्प्ले 720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन
- 64 बिट ऑक्टॉकोर मीडियाटेक
- 3 जीबी रॅम
- 16 जीबी इंटरनल मेमरी (64 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा)
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 360 डिग्री रोटेशन
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- व्हाईट आणि ब्लॅक कलर व्हेरिएंट
- 4G नेटवर्क सपोर्टिव्ह