Chinese Students Invisibility Cloak : तुम्ही बॉलिवूडचा 'मिस्टर इंडिया' (Mr. India) चित्रपट नक्कीच पाहिला असेल. लहानपणी हा चित्रपट पाहिल्यावर अनेकांची अशी इच्छा व्हायची की, आपल्यालाही असं गायब होता आलं तर... आता तुमची ही इच्छा ही पूर्ण होणार आहे. कारण मिस्टर इंडिया प्रमाणे तुम्हाला अदृश्य करणाऱ्या अनोख्या कोटचा शोध लावण्यात आला आहे. चीनमधील विद्यार्थ्यांनी या अनोख्या अशा मिस्टर इंडियाप्रमाणे तुम्हाला गायब करु शकणाऱ्या कोटचा (Mister India Coat) शोध लावला आहे. हा कोट घातल्यानंतर तुम्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येत नाही, तर गायब होता, असा दावा केला जात आहे.


चीन हा देश वेगवेगळ्या संशोधनासाठी ओळखला जातो. आता चीनमधील विद्यार्थ्याच्या या संशोधनाने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. चीनी विद्यार्थ्यांना एक खास कोट तयार केला आहे. हा कोट घालून तुम्ही सिक्युरिटी कॅमेऱ्यापासून वाचू शकता. हा कोट घातल्यावर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. हा कोट घातलेली व्यक्ती कॅमेऱ्याच्या नजरेतून गायब होते. विशेष म्हणजे हा कोट दिसायला अगजी साध्या कोटप्रमाणे आहे. त्यांच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर, हा कोट 6000 रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकतो. दरम्यान, या कोटवर बंदी येण्याची शक्यता आहे.


या खास कोटचं नाव InvisDefense असं आहे. हा कोट शरीरावर परिधान केल्याल्यावर तुम्ही सर्व सिक्युरिटी कॅमेऱ्यापासून नाही, पण AI इंटेलिजेंस कॅमेऱ्याच्या नजरेपासून वाचू शकता. हा कोट घातल्यावर तुम्ही AI इंटेलिजेंस कॅमेऱ्याच्या नजरेसमोरून गायब होऊ शकता. हा कोट अशा देशातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, जिथे AI इंटेलिजेंस कॅमेऱ्याच्या आधारे एखाद्यावर पाळत ठेवली जाते. 


चीन सरकार बंदी घालण्याची शक्यता


InvisDefense कोटला Huawei Technologies ने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पारितोषिकही मिळालं आहे. चीन मीडियानुसार, एका अहवालात असे म्हटले आहे की, InvisDefense कोट मशीन व्हिजनच्या AI अल्गोरिदमला चकवा देतो. सिक्युरिटी कॅमेऱ्यामध्ये रात्रीच्या वेळेसाठी असणाऱ्या तापमान शोधण्याच्या सेंसर (Body Heat Sensor) मॉड्यूललाही हा कोट गोंधळात टाकतो. दरम्यान, या InvisDefense कोटवर चीन सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे किंवा हा कोट सैन्य दलासाठी वापरण्यात येऊ शकतो.


AI म्हणजे काय? ( What is AI-Artificial Intelligence) 


AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते.


'या' खास कोटची किमतीची


हा कोट तयार करण्यासाठी शेकडो चाचण्या करण्यात आल्याचे कोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. या कोटबद्दलची विशेष बाब म्हणजे याची किंमत. हा कोट स्वस्त किंमतला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा कोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की, हा कोट तयार करण्यासाठी कमी खर्चे येतो. या कोटची सुरुवातीची किंमत सुमारे 6000 रुपये असू शकते.


कोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, InvisDefense युद्धामध्ये ड्रोन-विरोधी लढाईत किंवा मानवी संघर्षामध्ये वापरला जाऊ शकतो. मात्र, यासाठी या कोटच्या तंत्रज्ञानात आणखी सुधारणा करावी लागणार आहे.